कर्जत तालुक्यात रामनवमी साजरी
कर्जत, ता. २६ (बातमीदार) : तालुक्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तालुक्यातील गावांमध्ये श्रीराम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रीरामाचे दर्शन घेतले.
दहिवली, साळोख, बेंडसे, कडाव, नेवाळी, वेणगाव, माथेरान, नेरळ आणि कर्जत येथील कपालेश्वर मंदिरात रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडले. दहिवली येथील श्री विठ्ठल संस्थेच्या श्री राम मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रीराम पंचायतन पंचक्रोशी दैवज्ञ समाज ट्रस्टच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्यामुळे भालचंद्र घुमरे यांच्या निवासस्थानी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरती, त्यानंतर महापूजा, अभिषेक, रामजन्म सोहळा, पाळणा, रामरक्षा व रामपाठ अशा कार्यक्रमांची भक्तिभावाने सांगता झाली. विशेष म्हणजे श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन प्रत्येक भाविकाला जागेवर नेऊन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोकण आळीतील विजय जिनगरे आणि साळोख येथील कृष्णा कदम यांच्या निवासस्थानीही रामनवमी उत्सव पार पडला.
नेरळ येथील जुन्या बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात सकाळी पाळणा आणि श्रीराम जन्मकथेवर आधारित कीर्तन झाले. कर्जतच्या श्री कपालेश्वर मंदिरात पनवेलच्या मनस्वी गद्रे यांचे कीर्तन झाले. या वेळी अभिजित मराठे, प्रशांत करूळकर, सदानंद जोशी, सुधाकर निमकर हे विश्वस्त उपस्थित होते. दहिवली येथे महाप्रसादानंतर श्रीरामाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच बेंडसे, कडाव, साळोख, वेणगाव, नेवाळी आणि माथेरान येथेही रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.