अंबरनाथमध्ये दुचाकीला आग
अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : भरउन्हात दुचाकीची पेट्रोल टाकी क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने गाडीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. बी. के. केबिन रोडवरील नवरेनगर परिसरात ही घटना घडली असून, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने दुर्घटना टळली; मात्र या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीचालक नाईट ड्युटी संपवून घरी परतत असताना त्याने गाडीची टाकी ओव्हरफुल भरली होती. जुना बस स्टॉप परिसरातून जात असताना अचानक चालकाच्या पायाला आगीचे चटके बसू लागले. त्याने प्रसंगावधान राखून गाडी तत्काळ बाजूला उभी केली, तोच दुचाकीने पेट घेतला. रणरणते ऊन आणि टाकीतील पेट्रोलचा दाब वाढल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांकडून मदत
आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे जीवितहानी टळली. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पेट्रोल टाकी पूर्ण न भरता थोडी जागा मोकळी ठेवावी, तसेच वाहनांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.