मुंबई

वसई येथील शिक्षिका स्वाती शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

CD

वसई येथील शिक्षिका स्वाती शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
वसई, ता. २६ (बातमीदार) : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसई तालुक्यातील शिक्षिका स्वाती शिंदे यांची ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार ध्येय एज्युकेशन फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार असून, शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी हा सन्मान दिला जातो.
स्वाती शिंदे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायवन येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव निर्माण करणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात नवकल्पना राबवण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय, त्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षकवृंद व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT