मुंबई

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवट्याचा

CD

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवट्याचा
राष्ट्रवादी शरद पवार गटाची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प विकासाचा नसून फुगवट्याचा आहे. उत्पन्नाचे वास्तव दुर्लक्षित करून खर्चाचे आकडे वाढवले गेले आहेत. हा प्रकार म्हणजे दात टोकरून पोट भरण्याची कार्यशाळाच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी टीका केली आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेला सहा हजार २२१.१२ कोटींचा अर्थसंकल्प सध्या महासभेत चर्चेत असून, पाणी, कचरा व मूलभूत सुविधांवरच सर्वाधिक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या अनेक वर्षांत शहरासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आल्याचे प्रधान यांनी नमूद केले.
उत्पन्न तूट आणि फुगवटा गेल्या वर्षी अपेक्षित ९२० कोटींच्या उत्पन्नाच्या तुलनेत केवळ ५३६ कोटींचीच वसुली झाली. यंदा १,२०० कोटींचा अंदाज मांडला असला तरी पुन्हा मोठी तूट संभवते, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. तूट भरून काढण्याचा कोणताही ठोस आराखडा नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

धरणांसाठीही काढा कर्जरोखे
अर्थसंकल्पात जलकुंभ व जलवाहिन्यांसाठी ४४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या नव्या जलवाहिन्यांत पाणी येणार कुठून, असा सवाल प्रधान यांनी उपस्थित केला. मुंबईवर अवलंबून असलेल्या ठाण्याला स्वतःचे धरण उभारता आले नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश असल्याचे ते म्हणाले. क्लस्टर योजनेसाठी कर्जरोखे काढले जात असतील तर धरणासाठीही तेच धोरण अवलंबावे, अशी मागणी मनोज प्रधान केली.

‘ग्रीन ठाणे’ आणि विकासावर प्रश्न
रस्ते, मेट्रो, क्लस्टर आणि ‘ग्रीन ठाणे’ या संकल्पनांवर भर देण्यात आला असला तरी जुन्याच योजनांना नवी मांडणी दिल्याची टीका प्रधान यांनी केली. खासगी भागीदारीवर वाढता भर आणि कर्जाचा बोजा यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

SCROLL FOR NEXT