मुंबई

मुंबईला पुरेशा दाबाने पाणी

CD

मुंबईला पुरेशा दाबाने पाणी
भांडुप संकुलात ९०० एमएलडी क्षमतेचा पंप बसवणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः भांडुप संकुलात २२० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप असून, त्याच्या जोडीला आणखी एक ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप बसवण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका चार कोटी रुपये खर्च करणार आहे. दोन्ही पंप कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईला आणखी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.
भांडुप संकुलातून जलवाहिनीद्वारे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या २२० क्षमतेचा पंप आहे; परंतु मुंबईला आणखी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ९०० दशलक्ष लिटर पाणी वाहून नेणारा पंप बसवण्यात येणार आहे. भांडुप कॉम्प्लेक्स येथील ९०० एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) उदंचन केंद्रात ३,४३७.५ घनमीटर प्रतितास क्षमतेचा सेंट्रिफ्युगल पंप सेट बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा सेंट्रिफ्युगल पंप मोठ्या प्रमाणात पाणी जलद गतीने उचलून पुढे पाठविण्यास सक्षम असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...
महत्त्वाचे केंद्र
भांडुप येथील उदंचन केंद्र मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे बसविण्यात येणारा नवीन पंप कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा दाब सुधारेल आणि पाणीपुरवठ्यातील अडथळे कमी होतील. जुन्या यंत्रणांवरील ताण कमी होऊन देखभाल खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे. विशेषतः उष्णतेच्या काळात किंवा पाण्याची मागणी वाढल्यास या पंपामुळे पुरवठा सुरळीत ठेवणे सोपे होईल, असे पालिकेच्या जल विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT