घणसोलीत भीषण आग
दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : घणसोली सेक्टर १५ येथील एका गोडाऊनला आज (ता. २६) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत समाधान मंडप डेकोरेटर्स यांचे डेकोरेशनचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात असलेले बांबू खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सेक्टर १५ मधील या गोडाऊनमधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये बांबू, कपडे आणि प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली. या परिसरात दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आजूबाजूला निवासी इमारती असल्याने आग पसरण्याची दाट शक्यता होती; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने परिस्थिती हाताळली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.