मुंबई

पंजाब मेल खाली आल्याने व्यक्तीचा मृत्यू

CD

पंजाब मेलच्या धडकेत एकाचा मृत्यू
टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील टिटवाळा येथे पंजाब मेल या गाडीखाली येऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता. २६) रात्री ९ः३०च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पंजाब मेल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून फिरोजपूरकडे जाणारी लांब पल्ल्याची महत्त्वाची मेल गाडी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. गाडी स्थानकात येत असताना जुन्या बंद रेल्वे फाटकाच्या ठिकाणी संबंधित व्यक्ती अचानक रेल्वे रुळांवर आल्याने गाडीने धडक दिली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर स्थानकावरील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळ त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे सुमारे एक ते दीड तास रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. संबंधित व्यक्तीची ओळख पटले नसून, अपघात कशामुळे झाला याचा तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT