सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकाम
बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील प्रकार
बोईसर, ता.२८ (वार्ताहर): बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर बेकायदा बांधकाम केले आहे. या प्रकरणात पाठक बंधूंविरोधात महसूल विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मौजे सरावली येथील नवापूर रस्त्यालगत, हॉटेल शबरी शेजारी सर्वे क्रमांक १०४/१/अ (क्षेत्र २.२४.०० हे.आर.) जमीन शासनाच्या नावे नोंद आहे. या ठिकाणी सोमदत्त पाठक, कृष्णा पाठक तसेच शिवकुमार पाठक यांनी अतिक्रमण करून तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे उघड झाले. प्रकरणाची माहिती मिळताच बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी ग्राम महसूल अधिकारी हेमंत मुलाने यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेले बांधकाम बंद केले. या प्रकरणी गुंडकर यांच्या फिर्यादीवरून बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदववण्यात आहे. तर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांविरोधात कारवाईचे निर्देश महसूल विभागाला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.