मुंबई

अनधिकृत होर्डीग मोजणीसाठी २० लाखांचे कंत्राट

CD

अनधिकृत होर्डिंग मोजण्यासाठी २० लाखांचे कंत्राट
नगरसेवकांचा आक्षेप; महापालिकेचा अजब कारभार
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगची मोजणी करण्यासाठी एका खासगी संस्थेला तब्बल २० लाख रुपये देण्याचे मंजूर केल्याने नवा वाद उफाळून आला आहे. बुधवारी (ता. २५) पार पडलेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. पालिकेच्या या निर्णयाला जोरदार विरोध करीत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नगरसेवक पोटे यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार, महापालिकेला सध्या होर्डिंगच्या माध्यमातून केवळ पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रत्यक्षात २० बाय ३० आकाराचे एक होर्डिंग भाड्याने दिल्यास कंत्राटदाराला वर्षाकाठी ८ ते १० लाख रुपये मिळतात. शहरात साधारण १०० अधिकृत होर्डिंग असल्यास कंत्राटदाराला १२० कोटींची कमाई होते, मात्र महापालिकेच्या तिजोरीत फक्त पाच कोटी जमा होतात. अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगचा हा ताळमेळ प्रशासनाला का लावता येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नर्सरीवर १८ लाखांची उधळपट्टी?
प्रशासकीय राजवटीवर टीका करताना पोटे म्हणाले, की एकीकडे नगरसेवकांना निधी दिला जात नाही, तर दुसरीकडे आयुक्तांच्या बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी ५५ लाख रुपये खर्च केले गेले. यातील १८ लाख रुपये केवळ नर्सरीवर खर्च करण्यात आले आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केला. अनधिकृत होर्डिंग मोजण्याचे काम पालिकेचे कर्मचारी का करू शकत नाहीत, त्यासाठी बाहेरील संस्थेला २० लाख कशाला, असे प्रश्नही त्यांनी विचारले.

नगरसेवक निधीची मागणी
गेल्या पाच वर्षांत १,२०० कोटींचा निधी नगरसेवकांना मिळाला नसल्याने प्रभागांतील विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे यंदा महसुली उत्पन्नातून प्रत्येक नगरसेवकाला अडीच कोटींचा निधी देण्यात यावा, अशी आग्रही मागणी सचिन पोटे यांनी केली.
प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग मोजणीचे हे कंत्राट रद्द करावे अन्यथा या उधळपट्टीविरोधात आवाज उठवण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT