नवी मुंबईत राम जन्मोत्सव उत्साहात
बेलापूरच्या रामनवमी यात्रेला भाविकांची गर्दी
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुरूवारी (ता. २६) नवी मुंबईतील बेलापूर गावात मोठ्या उत्साहात पार पडला. राम जन्म झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, सभागृह नेते सागर नाईक, स्थानिक नगरसेवक अमित
श्रीराम जन्मोत्सवसाठी बेलापूरसह आजूबाजूचा परिसरही सजविण्यात आला होता. दिवाळे गाव येथील छाया कला सर्कलच्या ब्रास बॅण्ड पथकाने सुमधूर गीते सादर करुन श्रीराम चरणी आपली सेवा अर्पण केली. त्यानंतर बेलापूर पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी दिवसभर विविध प्रकारची भजने सादर करुन रामरायापुढे आपली सांगितीक सेवा बजावली. राष्ट्रीय किर्तनकार हभप चारूदत्त आफळे यांचे किर्तन नऊ दिवस उपस्थित श्रोतेगणांना मंत्रमुग्ध करत आहे. पाटील यांच्यासह महापालिका पदाधिकारी, अनेक नगरसेवक व नगरसेविका आदिंसह हजारो रामभक्तांनी यावेळी हजेरी लावली होती. हनुमान जयंतीपर्यंत हा किर्तन सोहळा बेलापूर गावात होणार आहे.
आजच्या फेस्टिव्हलच्या जमान्यातही नितांत श्रद्धा आणि साधेपणाने साजरा होणाऱ्या बेलापूरच्या राम-मारुती जन्मोत्सवाने आपली मराठमोळी परंपरा जपली आहे. ठाणे, मुंबईसह नवी मुंबईत नव्याने रहायला येणाऱ्या नागरिकांनी या सोहळ्याला आवर्जुन भेट दिल्याचे श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी सांगितले.