तळाशेत मतदारसंघात राष्ट्रवादीचा दमदार विजय : खा. सुनील तटकरे
माणगाव, ता. २८ (वार्ताहर) : मागील जिल्हा परिषद निवडणुकीत तळाशेत मतदारसंघात झालेल्या पराभवाची भरपाई करीत राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी दमदार पुनरागमन केले. संगीता बक्कम यांना विजयी करून कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. इंदापूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जि. प. सदस्या दिशा जाधव, माणगाव पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती मनीषा मालोरे, संगीता बक्कम, अलका केकाणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा उपाध्यक्ष शेखरशेठ देशमुख, भुवन सरपंच दीपक जाधव, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, संदेश मालोरे, खरवली सरपंच संतोष खडतर, उदय अधिकारी, मेघनाथ सातपुते, बाळा खातू, महेश महाजन, नितीन घोणे, शुक्रदास मोरे, संजय दळवी, राजू कदम तसेच इंदापूर विभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उमरोली-दिवाळी बौद्धवाडी येथील प्रमोद दळवी, संजय दळवी, कमलाकर दळवी, प्रभाकर दळवी, प्रथमेश दळवी, कृपा दळवी (उपसरपंच), स्वाती राजेंद्र गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य), दीपक धोंडू गायकवाड, गौतम प्रकाश साळवी, प्रमिला प्रकाश साळवी, प्रभावती प्रभाकर साळवी, प्रतीक्षा प्रभाकर साळवी, कृष्णा नामदेव मोरे, प्रभाकर नामदेव मोरे, प्राजक्ता प्रफुल्ल साळवी, प्रेरणा प्रफुल्ल साळवी, राजेंद्र धोंडू गायकवाड, विशाल संजीवन गायकवाड, नीलम गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
फोटो ओळ : खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.