मुंबई

नवी मुंबई महापौर चषक ४०+ स्पर्धेत दिवागाव-ऐरोली विजेते

CD

नवी मुंबई महापौर चषक ४०+ स्पर्धेत दिवागाव-ऐरोली विजेते
नेरूळ, ता.२८(बातमीदार) ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्व. राजीव गांधी क्रीडासंकुल, सीबीडी बेलापूर येथे आयोजित महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण गटात दिवागाव इलेव्हन तर शहरी गटात युनायटेड ऐरोली संघ विजेते ठरले. महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. क्रिकेटसारख्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी मैदानात उतरणारे सर्वच खेळाडू कौतुकास पात्र असल्याचे मत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी विजेत्यांसह सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंचे अभिनंदन केले.
ग्रामीण गटातील अंतिम सामन्यात दिवागाव इलेव्हनने बेलापूरगाव इलेव्हनवर मात केली. किशोर पाटील यांना मालिकावीर, योगेश भोईर सर्वोत्तम फलंदाज, उत्तम (ज्यु.) सर्वोत्तम गोलंदाज तर योगेश तांडेल सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरले.
शहरी गटात युनायटेड ऐरोलीने रायझिंग स्टार ऐरोलीवर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. जावेद शेख मालिकावीर ठरले, तर श्रीनिवास (खारीगाव) सर्वोत्तम फलंदाज, सुनील केणी सर्वोत्तम गोलंदाज आणि निलेश सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरले.
फ्लडलाईट्सच्या प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यांनी स्पर्धेला विशेष रंगत आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT