मुंबई

मुंबई विमानतळावर विसरभोळे प्रवासी

CD

मुंबई विमानतळावर विसरभोळे प्रवासी
दर महिन्याला सरासरी ७,५०० वस्तू हरवल्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२५मध्ये ५५.६ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. टर्मिनलवर दर महिन्याला सरासरी ७,५०० वस्तू हरवल्याची नोंद आहे. वर्षभरात सीएसएमआयएच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ विभागामध्ये ९०,२०० विसरलेल्या वस्तू पोहोचल्या. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ३५ टक्के अधिक होते.

लोक काय विसरतात?
- रोख पैसे, दागिने किंवा महत्त्वपूर्ण दस्तऐवजांसारख्या मौल्यवान वस्तू
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे व ॲक्सेसरीज
- कपडे, चष्मे किंवा अन्य व्यक्तिगत वापराच्या वस्तू यांसारख्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तू

ट्रॅकिंग प्रणाली
वस्तूंचे मूळ मालक शोधून काढता यावेत व ते शोधून काढण्यासाठी कमीत-कमी वेळ लागावा, या उद्देशाने सीएसएमआयएने एप्रिल २०२४ मध्ये ऑनलाइन लॉस्ट अँड फाउंड ट्रॅकिंग प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली अमलात आणल्यानंतर एप्रिल ते डिसेंबर २०२४ या काळात ३९,४६४ वस्तूंची नोंदणी झाली. अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या वस्तूंबाबत कळवणे व त्यांचा शोध घेणे शक्य झाले.

अशा मिळतात वस्तू परत
वस्तूचे तत्काळ टॅगिंग केले जाते आणि ‘लॉस्ट अँड फाउंड’ प्रणालीत तिची डिजिटल एण्ट्री केली जाते. ती वस्तू मुक्त करण्यापूर्वी मालकाची पडताळणी केली जाते. प्रवासी किंवा अधिकृत प्रतिनिधीकडे वस्तूचे सुरक्षित हस्तांतर केले जाते.

प्रश्न केवळ पैशाचा नव्हता...
एका प्रवाशाचे पैशाचे पाकीट हरवल्यामुळे तो खूपच अस्वस्थ झाला; मात्र या अस्वस्थतेचे कारण पाकिटातील कार्ड व रोख रक्कम नव्हते. त्याला चिंता होती ती एक रुपयाच्या छोट्याशा नाण्याची. बाकीच्यांसाठी ते केवळ एक नाणे होते; पण मालकासाठी तो ‘लकी चार्म’ होता. त्याने जेथे जेथे प्रवास केला होतो, तेथे तेथे हे नाणे त्याच्यासोबत गेले होते. ते हरवणे पाकीट हरवण्याहून अधिक त्रासदायक होते. लॉस्ट अँड फाउंड’ विभागाने अथक परिश्रमाने ते नाणे परत दिले.

प्रवेशद्वारापाशी सापडले मंगळसूत्र
बेळगावला गेलेल्या एका प्रवासी महिलेने तिचे सोन्याचे मंगळसूत्र पथकाच्या दक्ष प्रयत्नांमुळे परत मिळाले. ती महिला टर्मिनल एकवरून प्रवास करून महाराष्ट्राच्या दुर्गम भागात गेली होती, आपले मंगळसूत्र हरवले असल्याचे तिला इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर लक्षात आले. काही दिवसांनी मुंबईला परत आल्यानंतर या स्त्रीने तिचे मंगळसूत्र परत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

'बंद कर ना बे...' संजय दत्त पापाराझींवर भडकला, सोशल मीडियावर Viral Video होताच नेटकरी म्हणाले...'बोलण्याची पद्धतच...'

Leopard Found Dead: निरगुडसरमध्ये ऊसाच्या शेतात मादी बिबट्याचा मृतदेह; वनविभागाकडून पंचनामा, मृत्यूचं कारण शोधण्याचे प्रयत्न

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT