मुंबई

‘उल्हासनगर पॅटर्न’चा राज्यभरात डंका

CD

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेने राज्य सरकारच्या ‘१५० दिवसांच्या विशेष कृती आराखडा’ मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत डिजिटल प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांना राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला.
डिजिटल प्रशासनाच्या युगात महापालिकेने घडवलेला ‘उल्हासनगर पॅटर्न’ आता राज्यासाठी आदर्श ठरू लागला आहे. पारदर्शकता, गती आणि नागरिकाभिमुख सेवा यांचा संगम साधत आयुक्त आव्हाळे यांनी ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाचा मान मिळवला आहे. नागरिकांना ‘घर बसल्या सेवा’ देण्यावर विशेष भर देत महापालिकेने अनेक अभिनव उपक्रम राबवले. या मोहिमेचे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद या स्वतंत्र संस्थेमार्फत कडक निकषांवर करण्यात आले, ज्यामध्ये उल्हासनगरचे कार्य विशेष ठरले. १५० दिवसांत डिजिटलायझेशन, सेवा सुलभीकरण आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित कामामुळे महापालिकेने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पालिकेचे डिजिटल कार्य
पालिकेने ई-कार्यालय प्रणालीचा प्रभावी अवलंब करत अंतर्गत कामकाजात कागदविरहित संस्कृती रुजवली. त्यामुळे निर्णयप्रक्रियेला गती मिळाली आणि कामकाज अधिक पारदर्शक झाले. तसेच, जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील विविध प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक अचूक करण्यात आली. नागरिक सेवांमध्येही मोठा बदल घडवून आणत व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून सेवा वितरण अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यात आले.


राज्यस्तरावर मिळालेला हा सन्मान केवळ प्रशासनाचा नाही, तर संपूर्ण शहरवासीयांचा आहे. ‘१५० दिवसांच्या विशेष कृती आराखडा’ मोहिमेत पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख प्रशासन उभारण्यावर भर दिला. ई-कार्यालय, जीआयएस आणि डिजिटल सेवांच्या माध्यमातून कामकाज अधिक सुलभ व वेगवान करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना घरबसल्या सेवा देणे हा मुख्य उद्देश राहिला. हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फलित आहे. यापुढेही अधिक उत्तम आणि स्मार्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT