मुंबई

एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास मार्गी

CD

एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास मार्गी
खाजगी विकासकांकडून निविदा मागविल्या
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार असून, या प्रकल्पासाठी इच्छुक खाजगी विकासकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण तीन गटांमध्ये हा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, या भागाचे लवकरच नियोजनबद्ध शहरीकरण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी शासनाने १९६५ साली सुमारे दोन हजार ३३३ हेक्टर जमीन संपादित केली होती. मात्र, कालांतराने या जमिनींच्या काही भागांवर झोपडपट्ट्या वसल्या, तर अनधिकृत इमारतीही उभ्या राहिल्या. सध्या एमआयडीसीच्या सुमारे १३० हेक्टर अतिक्रमित जागेवर झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने या झोपडपट्ट्यांचा नियोजनबद्ध पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी रास्त व किफायतशीर दरात काम करणाऱ्या विकासकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा २७ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या पुनर्विकासामुळे झोपडपट्टी भागातील रहिवाशांना चांगल्या दर्जाच्या घरांची सुविधा उपलब्ध होणार असून, परिसराचा एकूणच कायापालट होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

MPSC Agriculture Officers: अवसरी बुद्रुकच्या शेतकरी कुटुंबातील तेजश्री व अक्षय हिंगे दांपत्याची कृषी विभागात अधिकाऱ्यपदी चमकदार कामगिरी

SCROLL FOR NEXT