मुरबाड (वार्ताहर) : रामनवमीनिमित्त तुळई येथील श्री स्वामी समर्थ मठात विश्वविनायक श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेतर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमात गोरगरीब महिलांना साडी व साहित्यवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्री राम प्रभूंच्या जयघोषात झाली. या वेळी तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक जयेश वागे यांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी ६ वाजता महिलांच्या हळदीकुंकू समारंभाला सुरुवात झाली. गोरगरीब महिलांना साडी व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर माउली महिला हरिपाठ मंडळ, माऊलीनगर (मुरबाड) यांच्या हरिपाठाने कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले. दानशूर व्यक्तिमत्त्व नानजीभाई ठक्कर उपस्थित होते. कार्यक्रमात आयोजक विठ्ठल चौधरी, तृप्ती चौधरी आणि नरेश म्हाडसे यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती स्वरा चौधरी, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, तुळई गावच्या सरपंच चौधरी, पोलिस पाटील शिवाजी चौधरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.