इंधन टंचाईचे लोण वसईत
पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा; चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
वसई, ता. २९ (बातमीदार) ः आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सिलिंडर, इंधन टंचाईच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. समाजमाध्यमांवरील चर्चांमुळे वाहनात पुरेसे पेट्रोल, डिझेल भरण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळेच वसई-विरार शहरातील पेट्रोल पंपावर रांगा दिसू लागल्या आहेत.
पेट्रोल, डिझेल इंधनावर चालणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांना इंधन टंचाईची भीती वाटू लागली आहे. वाहतुकीअभावी पेट्रोल पंपापर्यंत येण्यास उशीर लागत असल्याने थोड्या वेळाकरिता पेट्रोल पंप बंद झाले तरी वाहनचालक धाव घेत आहेत. त्यामुळे शहरातील पंपांवर प्रचंड रांगा लागत आहेत. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना फटका बसत आहे. सीएनजीवर अधिक प्रमाणात रिक्षाव्यवसाय अबलंबून आहे. नालासोपारा पूर्वेकडील सीएनजी पंप बंद झाल्याने वसई पूर्वेकडे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. प्रशासनाने जरी इंधनसाठा उपलब्ध होत आहे, असे स्पष्ट केले असले तरी कामानिमित्त बाहेर पडताना इंधन संपले, अशी चिंता चालकांना सतावत आहे.
-------------
खवय्यांची निराशा
वसई-विरार शहरात सिलिंडरची झळ पोहोचली आहे. त्यामुळे व्यावसायिक इलेक्ट्रिक शेगडी, चुलीचा वापर करत आहेत. काही ठिकाणी कोळशाचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. खाद्यपदार्थाच्या दुकानात सिलिंडरचा अधिक वापर टाळला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवडणारा बटाटावडा, अन्य खाद्यपदार्थ मिळत नसल्याने खवय्यांची निराशा होत आहे.
----------
पंपावर पेट्रोल मिळत आहे; मात्र इंधन बंद होऊ शकते, अशी चर्चा रंगल्यामुळे वाहनांच्या रांगा पेट्रोलपंपावर वाढल्या आहेत.
- अक्षय वधानी, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.