‘उज्ज्वला’ योजनेचे लाभार्थी त्रस्त
४५ दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीचा फटका
जव्हार, ता. २९ (बातमीदार) ः केंद्र शासनाची उज्ज्वला गॅस योजना जव्हारच्या ग्रामीण भागात फलदायी ठरत आहे. मोफत गॅस जोडणी मिळालेल्या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानही मिळत होते; मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस आरक्षित करण्याचा ३० दिवसांचा कालावधी ४५ दिवसांचा झाल्याने सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिलावर्गाला बसला आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना सध्या गॅसटंचाईची समस्या भेडसावत आहे. सिलिंडर मिळण्यात होणारा विलंब नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. गॅस नोंदणीसाठी पूर्वीची ३० दिवसांची मर्यादा वाढवून ४५ दिवस केल्याने नाराजी आहे. जव्हार तालुक्यात बहुसंख्य नागरिक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे येथे ग्रामीण भागात बऱ्याच सुविधा मिळत असल्याने सध्या गॅसअभावी अडचण सहन करावी लागते. गॅसपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका परिसरातील अनेक गावांना बसत आहे. सणासुदीच्या काळातच गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यातच धार्मिक कार्यक्रम, तसेच गावोगावी सुरू असलेल्या यंत्रांमुळे गॅसची मागणी वाढली आहे. गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. तासनतास प्रतीक्षा करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
--------------------------
...नाहीतर तहसीलवर मोर्चा
गॅसपुरवठ्याचा मुद्दा सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तत्काळ ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलनाचा इशारा झाप ग्रामस्थांनी दिला आहे.
------------------------
गॅस आरक्षित करण्यासाठी ३० दिवस लागायचे; मात्र आता हा कालावधी ४५ दिवसांचा आहे. त्यामुळे स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न पडत आहे.
- वनिता ठाकरे, गृहिणी
---------------------------------
वर्षाला १५ सिलिंडर मिळत असल्यामुळे अडचण येत नव्हती; मात्र आता शहरी भागासाठी २५ दिवसांचा कालावधी आहे. त्यातही गॅस सिलिंडर मिळण्यासाठी काही दिवस जातात. त्यामुळे गॅस नोंदणी मर्यादा कमी करून नागरिकांना सहकार्य करावे.
- मनीषा वाणी, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.