मुंबई

नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून वाद

CD

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेतील प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील झोपडपट्टी विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस न देता १८ मार्चपासून तत्काळ निलंबित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या कारवाईविरोधात भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटकडून प्रशासनाकडे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी १८ मार्चला महापालिका प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर महापौर व आयुक्तांसोबत चर्चा झाली. त्यानंतरही निर्णय न झाल्याने २३ मार्चला महापौर नारायण चौधरी यांच्या दालनात पुन्हा बैठक झाली. याला पाच दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महासंघाने प्रशासनाला स्मरणपत्र देत २८ मार्चपासून प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम सुरू केले आहे. ५ एप्रिलपर्यंत हा निषेध सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रशासनाने पर्यायी निर्णय न घेतल्यास ६ एप्रिलपासून महापालिकेसमोर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

कोट्यवधींचे नुकसान
महासंघाच्या म्हणण्यानुसार, झोपडपट्टी विभागातील नऊ प्रभाग लिपिकांना निलंबित केल्यामुळे महापालिकेला अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासाठी उपआयुक्त (कर) विभाग आणि उपआयुक्त (सामान्य प्रशासन) जबाबदार असून, ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी महासंघाने आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील वातावरण तापले असून, प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT