मुंबई

दिलीप आमले यांना महारक्षक व्यसनमुक्ती पुरस्कार

CD

दिलीप आमले यांना महारक्षक व्यसनमुक्ती पुरस्कार
नेरूळ, ता.२९ (बातमीदार) : समाजासाठी व्यसनमुक्ती जनजागृती गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या समाज प्रबोधनकार दिलीप आमले यांना महारक्षक व्यसनमुक्ती पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालय व सारथी सुरक्षा यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (ता.३०) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
दिलीप आमले यांनी रिक्षाचालक बांधवांसह विद्यार्थ्यांमध्ये दारू, गोवा, मावा, गुटखा, सिगारेट यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मोफत मार्गदर्शन संवाद आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था व युनियन येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवून समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यांच्या या साऱ्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

SCROLL FOR NEXT