मुंबई

काळ्या जादूच्या संशयातून वृद्धाचे अपहरण व मारहाण

CD

काळ्या जादूच्या संशयातून वृद्धाला मारहाण

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : काळी जादू केल्याच्या संशयावरून एका ६२ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भाईंदर पूर्व येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळखीच्या व्यक्तीवर काळी जादू केल्याच्या संशयातून भाईंदर पूर्व परिसरात राहणारे ६२ वर्षीय सुरेश सोळंकी यांचे पाच जणांनी अपहरण केले होते. आरोपींनी सोळंकी यांना एका चारचाकी गाडीत बसवून त्र्यंबकेश्वर येथे नेले. गाडीत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत चाकूने त्यांच्या शरीरावर जखमाही करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वर येथे सोडून देत आरोपींनी पळ काढला. सोळंकी यांनी कसेबसे भाईंदर गाठले व नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी काशिमीरा परिसरात लपल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी लपून बसलेल्या चार आरोपींना शनिवारी (ता. २८) ताब्यात घेतले. त्यातील व एक आरोपी फरार असून, दोन वयस्क आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले व दोन आरोपींना अटक करण्यात आली.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT