मुंबई

पंजाब मेलखाली प्रवाशाचा मृत्यू

CD

टिटवाळ्यात पंजाब मेलखाली प्रवाशाचा मृत्यू
टिटवाळा, ता. ३० (वार्ताहर)ः टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २६) संध्याकाळी पंजाब मेलखाली चिरडून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीमुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप करत, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण होते. ‘डीआरयूसीसी’ सदस्य आणि संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी याप्रकरणी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.

आरपीएफ आणि आयओडब्ल्यू विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे बळी जात आहेत. जोपर्यंत या दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत रेल्वेची ‘चलता है’ वृत्ती बदलणार नाही, असे श्याम उबाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या अपघातामुळे लोकल गाड्या एक तास उशिराने धावत होत्या, ज्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे दावे फोल ठरत असल्याची टीका आता सर्व स्तरांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT