छेडछाडीचा जाब विचारल्याने हल्ला
बोईसरमध्ये तिघांकडून मुलीच्या वडिलांना मारहाण
बोईसर, ता. ३० (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना तिघांनी लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना साईलोकनगर, गणेशनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यादव (वय ३५) यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत ये-जा करताना अमन यादव वारंवार पाठलाग करून छेडछाड करत होता. याबाबत कुटुंबीयांनी यापूर्वीही संबंधितांना समज दिली होती. या प्रकारामुळे शनिवारी (ता.२८) रात्री साडेनऊच्या सुमारास अजितकुमार यादव जाब विचारण्यासाठी आरोपींच्या घरी गेले होते. या वेळी अमन यादव, त्याचे वडील मिड्डू ऊर्फ मिठ्ठ यादव, भाऊ सत्यम यादव यांनी त्यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०९(१), ११८(२), ७८, ११५ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यात अजितकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे सिल्वासा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-------------------------------------
माझ्या पतीला निर्दयी मारहाण करण्यात आली. संबंधित आरोपींना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
- सुमन यादव, पीडित व्यक्तीची पत्नी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.