वसईच्या स्वच्छतेसाठी मोहीम
५३ बावखलांचे पुनरुज्जीवन, चर्च-मनपाचा संयुक्त उपक्रम
विरार, ता.३० (बातमीदार)ः वसईच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘क्लीन वसई’ अंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ाया अंतर्गत नंदाखाल धर्मग्रामात ५३ बावखलांच्या पुनरुज्जीवनाचे काम होली स्पिरिट चर्च, वसई-विरार पालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली आहे.
काळाच्या ओघात दुर्लक्षित बावखलांमध्ये कचरा साचल्याने डासांचा धोका वाढला आहे. या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक धर्मगुरू, नागरिक पुढे सरसावले आहेत. महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याभागातील ५३ बावखल स्वच्छ करून पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. या मोहिमेअंतर्गत गोट्राळ येथील पहिले बावखल स्वच्छ करण्यात आले आहेत. वसईच्या पश्चिम पट्ट्यात ही मोहीम राबवण्यात येत असून नंदाखाल चर्चचे फादर बँड, जाणो डिमेलो, रॉबर्ट परेरा यांनी पुढाकार घेतला आहे.
=====================================
पुरातन बावखले जपण्याचा, तिचे संवर्धन करण्याचे काम सुरु आहे. या उपक्रमाला पालिका सर्वोतोपरी मदत करणार आहे.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.