दत्तात्रय पावडे यांचे निधन
कासा (बातमीदार) ः आंबेदे गावातील सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले दत्तात्रय पावडे (वय ७४) यांचे मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
दत्तात्रय पावडे यांनी आयुष्यभर शेतीच्या माध्यमातून कुटुंब उभे करताना सामाजिक बांधिलकी जपली. शांत, सुसंस्कृत, समाजभिमुख स्वभावामुळे गावात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या निधनाने आंबेदे गावाने एक ज्येष्ठ, अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडून पुढे चालविला जात असून, त्यांचे पुत्र, पुतणेही समाजकार्यात सक्रिय आहेत.