मुंबई

मेट्रो ५ चा मार्ग मोकळा

CD

मेट्रो-५चा मार्ग मोकळा
कापूरबावडी जंक्शनवर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) : ठाणे, भिवंडी आणि कल्याण या उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ऑरेंज लाइन’ (मेट्रो-५) प्रकल्पाने अखेर वेग घेतला आहे. ठाण्यातील कापूरबावडी नाका परिसरातील मार्गातील शेवटचा आणि सर्वात कठीण तांत्रिक अडथळा यशस्वीपणे दूर करण्यात आला आहे. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या टप्प्यातील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने आता मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मोठी गती मिळाली आहे.

कापूरबावडी स्थानकाजवळ अवघ्या काही मीटर अंतराचे काम एका जुन्या आणि धोकादायक इमारतीमुळे प्रलंबित होते. ही इमारत भुईसपाट केल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर मेट्रो पिलर उभे केले. तीन दिवसांपूर्वी (ता. २७ ) या पिलरवर मुख्य गर्डर बसवण्यात आला आणि अर्धवट राहिलेला मार्ग जोडला गेला. हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गर्डरची पूजा करून, हार-फुले आणि पताकांनी सजावट करत आनंद व्यक्त केला.

प्रवासाचा वेळ वाचणार
२४.९० किमी लांबीचा हा ‘ऑरेंज लाइन’ मार्ग ठाणे आणि भिवंडी-कल्याणमधील रहिवाशांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. सध्या या भागातील जनतेला मुंबईला जाण्यासाठी केवळ बस आणि लोकल ट्रेनवर अवलंबून राहावे लागते. मेट्रो सुरू झाल्यानंतर ही अवलंबिता कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सुखकर होईल.

दोन टप्प्यांतील प्रकल्प
मेट्रो-५चे काम दोन टप्प्यांत विभागले आहे.
पहिला टप्पा : ठाणे ते भिवंडी (ज्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे).
दुसरा टप्पा : भिवंडी ते कल्याण

ऑरेंज लाइनची प्रमुख स्थानके
कापूरबावडी, बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धमानकर नाका, गोपाळनगर, टेमघर, राजनोली गाव, गोवेगाव एमआयडीसी, कोनगाव, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, भिवंडी, सोनाले आणि कल्याण (कृषी उत्पन्न बाजार समिती).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

झोपडपट्टी भागातील पाणी समस्या संपणार! १४ किलोमीटरची पाइपलाइन टाकणार; नवा जलप्रकल्प काय? जाणून घ्या...

पुण्यात अवकाळी पावसाने रस्त्यावर साचलं पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; रस्ते जलमय

Beautiful People : भारताच्या 'या' टोकावर राहते अशी जमात जिथे लोक जगतात १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य, सत्तरीनंतरही बायका दिसतात तरुण

PNB Scam: माजी लिपिकाचा दोषमुक्तीसाठी अर्ज, पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT