एसआरए प्रकल्पाच्या विकसकावर होणार कारवाई
- दहा वर्षे घरे रखडली
- पाच वर्षांपासून भाडेही दिले नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : कोपरी येथील एसआरए प्रकल्पात गेली १० वर्षे रहिवाशांना घरे न देता तसेच कोट्यवधींचे भाडे थकवणाऱ्या विकसकावर कारवाई करण्याचे संकेत एसआरए प्रशासनाने दिले आहेत. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने ही भूमिका घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कोपरीतील प्रकल्पातील रहिवाशांना अद्याप हक्काची घरे मिळालेली नसून सुमारे पाच कोटी रुपयांचे भाडेही विकसकाने थकवले आहे. त्याच वेळी सेल इमारतीतील घरांची विक्री सुरू असल्याचा आरोप करत केळकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याप्रकरणी चार दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास रहिवाशांसह एसआरए कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विकसकावर कारवाई करण्यास मान्यता दिल्याचे केळकर यांनी सांगितले.
रेंटल इमारतीची दुरवस्था
बाधितांना देण्यात आलेल्या रेंटल इमारतींची अवस्था अत्यंत खराब असून, बीएसयूपी योजनेअंतर्गत घरे मिळण्यातही विलंब होत आहे. उलट या तात्पुरत्या घरांमधून बाहेर पडण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये असंतोष आहे. याबाबत बाधित कुटुंबांची संख्या, उपलब्ध घरे आणि प्रतीक्षा यादी यांचा एकत्रित आराखडा तयार करून लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचेही केळकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.