शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी युवासेना शहर युवाधिकारी हर्षद राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. अनुभवी डॉक्टरांची कमतरता असून ऑक्सिजन, ट्रॉमा किट तसेच रुग्णांना स्थिर करण्यासाठी लागणारी यंत्रणाही मर्यादित आहे. परिणामी, अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर लहान-मोठे अपघात वारंवार घडतात. त्यामुळे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करून तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग कर्मचारी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यापूर्वीही प्रशासनाला तोंडी व लेखी सूचना दिल्या असून अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य मागण्या :
उपजिल्हा रुग्णालयात तातडीने २०० खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करावा
तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करावी.
२४ तास अनुभवी वैद्यकीय अधिकारी व आपत्कालीन औषधसाठा ठेवावा.
रुग्णवाहिका समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.