मुंबई

माटगाव अपघात प्रकरणी वर्षानंतर गुन्हा दाखल

CD

माटगाव अपघातप्रकरणी वर्षानंतर गुन्हा दाखल

तारापूर, ता. १ (बातमीदार) वाणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माटगाव परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२५ ला सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास धापशीपाडा, माटगाव येथे सुरेश रामजी भोनर हे सायकलवरून वाणगावच्या दिशेने जात होते. तेव्हा जयवंत माच्छीने आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल भरधाव वेगाने चालवत त्यांच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात भोनर हे रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना तत्काळ वाणगावयेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी डहाणू येथील सेवा नर्सिंग होम या खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ६ मार्च २०२५ला मध्यरात्री त्यांना वापी (गुजरात) येथील सीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १३ मार्च २०२५ला पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर आरोपीने तक्रारदारांस पोलिसांत तक्रार न करण्याची विनंती करीत सर्व उपचार खर्च उचलण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तक्रारदार संगीता नंदकिशोर भगत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी वाणगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Building: एअर इंडिया इमारत सरकार खरेदी करणार; डील लवकरच पूर्ण होणार, कारण काय?

Mumbai Bengaluru Express Railway : मुंबई -बंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणेकरांना जलद सेवा, असे असेल वेळापत्रक

"आता स्टेजवर ब्लाऊजची बटणं काढली जातायेत" वाढत्या डीजे शोबाबत मेघा घाडगेंचा खळबळजनक खुलासा

Instagram Teleprompter Feature: आता Reels बनवणं होणार अगदी सोपं! Instagramचं नवं फीचर चर्चेत; 'असं' वापरलं तर झटपट वाढतील फॉलोवर्स

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन; राज्यभरात राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT