पनवेलमध्ये आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा
ममता म्हात्रे यांचा महापौर नितीन पाटील यांच्याकडे प्रस्ताव
कामोठे, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात महिलांसाठी अत्याधुनिक पिंक टॉयलेट्स, महिला सुविधा केंद्र व सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे दिला आहे. या केंद्रांचे व्यवस्थापन महिला स्वयंसहाय्यता गटांकडे देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा उपक्रमही या योजनेत समाविष्ट आहे.
महिलांच्या सन्मानासाठी रेल्वे स्थानके, बाजारपेठा, बस स्थानके, उद्याने व शासकीय कार्यालय परिसर २५ ते ५० केंद्रे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तसेच विविध उद्योगांच्या सीएसआर निधीचा वापर करून महापालिकेवरील आर्थिक भार कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पिंक टॉयलेट्समध्ये आधुनिक व स्वच्छ शौचालयांसोबतच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, वापरलेल्या नॅपकिन्सच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर, तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उपलब्ध करून देणार आहे, तर केंद्रांच्या बाह्य भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल. याशिवाय २४ तास महिला रक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधा केंद्रांमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळण्यासाठी पॅनिक बटण यांसारख्या स्मार्ट सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना
ममता म्हात्रे यांनी राष्ट्रीय सौरऊर्जा अभियान व हरित ऊर्जा धोरणाअंतर्गत महापालिका क्षेत्रातील गृहसंकुलांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबतही प्रस्ताव सादर केला. याद्वारे सोसायटी स्तरावर वीजनिर्मिती, कॉमन सुविधांसाठी ऊर्जापुरवठा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा आणि नेट मीटरिंगचा वापर यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वीज खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळणार असल्याचा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.