Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

Raju Shetti Farmers Agitation : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात सोलापुरातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur

esakal

Updated on

Pune Solapur Highway Blocked : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. संत सावता माळी यांच्या संजीवन समाधीस्थळासाठी ओळखल्या जाणाऱ्या अरणसह पंचक्रोशीतील गावांतील बाधित शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

महामार्गावर रास्ता रोकोवरून राजू शेट्टी आणि सोलापूर पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक आंदोलन मोडून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com