केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

Matheesha Pathirana Suffers Injury: आयपीएल २०२६ मध्ये पुनरागमन करताना मथीशा पथिरानाला गुजरातविरुद्धच्या सामन्यात दुखापतीची समस्या जाणवली. मैदानावर उपचार घेतल्यानंतर त्याला बाहेर जावं लागल्याने कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे.
Matheesha Pathirana Suffers Injury

Matheesha Pathirana Suffers Injury

esakal 

Updated on

Matheesha Pathirana Suffers Injury: आयपीएल(IPL) २०२६ च्या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. या हंगामात बऱ्याच खेळाडूंना दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकावं लागलं आहे. यातच काल झालेल्या गुजरात (GT) आणि कोलकाता यांच्या सामन्यात आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच पदार्पण करताना मथीशा पथिरानाला गोलंदाजी करताना मैदानाबाहेर जावं लागल्याने त्याच्या दुखापतीची भीती वाढली आहे. टी-२० वर्ल्डकपदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर या हंगामातील पहिला सामना खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर फक्त ८ व्या चेंडूलाच अस्वस्थ दिसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com