मुंबई

भिवंडीत ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

CD

ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री घडली. चारुशीला ऊर्फ श्रद्धा गणेश शिंदे असे मृत तरुणीचे नाव असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९) रात्री ९.१५च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाणपुलाच्या पुढे हा अपघात झाला. एका अज्ञात ट्रकचालकाने आपले वाहन अतिशय वेगात आणि बेदरकारपणे चालवून दुचाकीच्या हँडलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील प्रथमेश शिंदे (वय २६) आणि चारुशीला दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने ट्रकचे चाक चारुशीलाच्या उजव्या पायावरून गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात घडल्यानंतर चालक ट्रकसह पसार झाला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्याची मागणी आता नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT