खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी
शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखपदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.