बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी युतीच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्षा प्रियंका दामले आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली इंदोर येथे अभ्यास दौरा काढला हो. यात शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. दौऱ्यादरम्यान इंदोर आणि उज्जैन महापालिकांना भेट देत त्यांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला.
दौऱ्यात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्वच्छता व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, पाणीपुरवठा, रस्ते देखभाल, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सहभागावर आधारित योजनांची माहिती घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, काटेकोर नियोजन आणि वेळेच्या व्यवस्थापनामुळे शहर प्रशासन अधिक परिणामकारक कसे होते, याचा अनुभव प्रतिनिधी मंडळाने घेतला. उज्जैन शहराने ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर विशेष स्थान मिळवले आहे. घराघरातून कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प आणि जनजागृती उपक्रमांमुळे उज्जैनने स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी उपक्रम, सीसीटीव्ही नेटवर्कद्वारे शहर नियंत्रण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल तसेच पर्यावरणपूरक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उज्जैन महानगरपालिकेची शिस्तबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक कार्यपद्धती पाहून प्रतिनिधीमंडळ प्रभावित झाले. त्याच धर्तीवर बदलापूरमध्ये स्वच्छता, नागरी सुविधा आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ठोस व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा अभ्यास दौरा केवळ औपचारिक न राहता बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.