अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : शहरातील शिवनगर परिसरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. संतप्त नागरिकांनी अखेर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे धाव घेतली. भेटीदरम्यान डॉ. जुबेर एस. शाह, बिलाल उमर (इंजिनिअर) तसेच मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे आमदारांचे लक्ष वेधले.
शहरात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असून अनेक भागांमध्ये वेळेवर व पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी सलीम भाई (खिलौने वाले) यांच्या ठिकाणाहून जाणारी जलवाहिनी बंद करून ती हुसैनी चौकातील मुख्य वाहिनीला जोडण्याची मागणी केली. यामुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एमएमएम स्कूलच्या मागील भाग, एमएमएम स्कूल रोड आणि मुघल्स हॉटेल परिसरात पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने त्या भागात योग्य पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
समस्येवर तोडगा काढणार
एमजीपीचे अधिकारी शिखाकोरे आणि देशपांडे यांनी नागरिकांना दिलासा देत पुढील दोन दिवसांत आवश्यक कामांना सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अशाच प्रकारची आश्वासने नागरिकांमध्ये साशंकता कायम आहे. प्रत्यक्षात काम कितपत आणि किती लवकर पूर्ण होते, यावरच शिवनगरकरांचा विश्वास अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.