हनुमान जन्मोत्सवात बाटू लेणीचा देखावा
विलेपार्लेत विविध कार्यक्रमांचे आयोजन
जोगेश्वरी, ता. १ (बातमीदार) : हनुमान जयंतीनिमित्त विलेपार्ले पूर्व येथील साठेवाडी परिसरात यंदा भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. हनुमान जयंती उत्सव मंडळाने मलेशियातील प्रसिद्ध बाटू लेणी येथील भगवान मुरुगन मंदिराची देखणी प्रतिकृती साकारत भाविकांसाठी खास आकर्षण निर्माण केले आहे.
मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण गोपुरम, गुहेसारखी रचना आणि आकर्षक रंगसंगती यांचे बारकाईने सादरीकरण करण्यात आले आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक संदीप गोरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकार आणि पार्लेस्वर ढोल-ताशा पथकातील तरुणांनी हा देखावा साकारला आहे.
यंदा मंडळाचा ४३वा उत्सव असून, विविध कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २) हनुमान जयंती उत्सव, तर शुक्रवारी (ता. ३) सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नृत्य स्पर्धा, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, मराठी व हिंदी भजनांचा विशेष कार्यक्रमही पार पडणार आहे. नागरिकांनी आवर्जून भेट देऊन देखावा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.