पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
विरार, ता. १ (बातमीदार) : मिरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश माध्यम क्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
हे आरोग्य शिबिर गुरुवारी (ता. २) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वोक्हार्ट रुग्णालयाच्या १४व्या मजल्यातील ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखरेची चाचणी, फुप्फुस, नेत्र, हाड व दंत तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही उपलब्ध असणार आहे. या शिबिराचा पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.