डॉ. किरण चचलानी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार
पनवेल, ता. १ (बातमीदार) ः बॉस चक्की फ्रेश आटा आणि बॉस फूड्स प्रॉडक्ट्सचे संस्थापक डॉ. किरण चचलानी यांना प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान कलाम यांच्या कुटुंबातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात कलाम कुटुंबातील एपीजेएमजे सलीम शेख आणि अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सचिव एपीजेएम जैनुलाबुदीन उपस्थित होते. याशिवाय जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त अजय विलास वैद्य, कार्यक्रमाच्या आयोजिका सोनिया मेयर्स तसेच परीक्षक मंडळाचे सदस्य व सल्लागार डॉ. राकेश पोडुवाल यांनीही उपस्थिती लावली. दरम्यान, या सोहळ्याला अभिनेत्री कुनिका सदानंद यांची विशेष उपस्थिती लाभली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.