मुंबई

बदलापूरचा ‘ध्रुवतारा’ ध्रुवांश!

CD

स्वमग्नतेवर मात करत ‘ध्रुवांश’ बनला गणिताचा जादूगार!
बदलापूरच्या पालिका शाळेतील कॅल्क्युलेटर बॉयची भरारी
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १ :
ऑटिझम (स्वमग्नता) हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर मदतीची गरज असलेले मूल येते; मात्र बदलापूरच्या सोनिवली येथील नगरपालिका शाळा क्र. ७० मध्ये शिकणाऱ्या ध्रुवांश सागर थोरात याने हा समज मोडीत काढला आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी ध्रुवांश हजारो संख्यांचे वर्ग आणि पाच अंकी गुणाकार क्षणात सोडवून उपस्थितांना थक्क करत आहे. त्याच्या या विलक्षण बुद्धिमत्तेमुळे तो आज ‘कॅल्क्युलेटर बॉय’ म्हणून ओळखला जात आहे.

१६ एप्रिल २०१६ रोजी जन्मलेल्या ध्रुवांशमध्ये दोन वर्षांचा असताना ऑटिझमची लक्षणे दिसली. तो हाकेला ओ देत नव्हता की नजरेला नजर भिडवत नव्हता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचार आणि शिक्षणाचे मोठे आव्हान पालकांसमोर होते. अनेक नामांकित शाळांनी ‘स्पेशल स्कूल’चा रस्ता दाखवत प्रवेश नाकारला. अखेर सोनिवली पालिकेच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी ध्रुवांशमधील ठिणगी ओळखली आणि त्याला शाळेत प्रवेश दिला.

ध्रुवांशची गणितातील गती संगणकापेक्षा कमी नाही. मोठ्या संख्यांचे विस्तारित रूप मांडणे असो वा कठीण स्पेलिंग सांगणे, ध्रुवांश यात निष्णात आहे. त्याच्या या प्रतिभेला वाव देण्यासाठी शाळेने एक अनोखी संकल्पना राबवली आहे ती म्हणजे ‘ध्रुवांशचा फळा’. वर्गात त्याच्यासाठी एक स्वतंत्र फळा राखीव आहे, जिथे तो मनात येईल तशी गणिते सोडवतो. यामुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

समावेशक शिक्षणाचे आदर्श मॉडेल
शाळेतील शिक्षिका माधवी धांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ध्रुवांशसाठी शाळेचे नियम लवचिक केले आहेत. त्याला वर्गात मुक्त वाव दिला जातो. ध्रुवांश आमच्या शाळेचा ध्रुवतारा आहे, अशा शब्दांत मुख्याध्यापक कौतुक करतात, तर शाळेने दिलेल्या आधारामुळेच माझा मुलगा आज स्वतःच्या पायावर उभा राहण्याची स्वप्ने पाहत आहे, अशी भावना त्याची आई सरिता थोरात यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT