चेंबूर नाका येथील भारत गॅस वितरण कार्यालय बंद; नागरिक त्रस्त
चेंबूर, ता. १ (बातमीदार) : चेंबूर नाका परिसरातील भारत गॅस वितरण कार्यालयातील संगणक प्रणाली बंद पडल्याने मागील दोन दिवसांपासून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना तक्रारी नोंदविणे तसेच आवश्यक माहिती मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. अनेक ग्राहकांनी वेळेवर गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही त्यांना अद्याप सिलिंडर मिळालेले नाही. काही ठिकाणी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
संगणक प्रणाली बंद असल्यामुळे तक्रारी नोंदविणे, बुकिंग स्थिती जाणून घेणे किंवा कार्यालयीन मदत मिळविणे कठीण झाले आहे. कार्यालय नेमके कधी सुरू होणार, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संगणक प्रणाली पूर्ववत सुरू करावी आणि गॅस वितरण सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.