कुर्डूगडावर स्वच्छता मोहीम
शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
माणगाव, ता. १ (वार्ताहर) : कुर्डूगड येथे रविवारी (ता. २२ मार्च) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. टीम कुर्डूगड, आंतरगाव निजामपूर क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन आणि शिवप्रतिष्ठान उंबर्डी आणि इंजाई माता क्रिकेट संघ, बोरमाच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात माणगाव-निजामपूर परिसरातील १०० हून अधिक शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘जय शिवराय’च्या घोषणांनी किल्ल्यावरील वातावरण दुमदुमले.
या मोहिमेत महादरवाजापासून हनुमंत बुरुजाकडे जाणारी अरुंद व धोकादायक पायवाट स्वच्छ करून माती, गवत आणि दगड हटवण्यात आले. परिणामी हा मार्ग अधिक रुंद व सुरक्षित करण्यात आला. तसेच गडावरील वाड्याच्या अवशेषाजवळील परिसरही स्वच्छ करण्यात आला. गडाच्या मागील बाजूस असलेल्या सर्वात मोठ्या पाण्याच्या टाक्याच्या स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली असून, गड पूर्ववैभवात आणण्याचा निर्धार शिवप्रेमींनी व्यक्त केला.
या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आंतरगाव निजामपूर क्रिकेट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जयेश साळवी आणि टीम कुर्डूगड तसेच शिवप्रतिष्ठान उंबर्डी, इंजाई माता क्रिकेट संघ, बोरमाच यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन जयेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माजी सैनिक प्रमोद शिंदे, सुशील कदम यांनी उपस्थित राहून सहभागींचे मनोबल वाढवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.