मुंबई

घर खरेदीदारांना अनिश्चित काळापर्यंत ताटकळत ठेवू शकत नाही: उच्च न्यायालय

CD

ग्राहकाला पैसे काढण्याची
सशर्त परवानगी कायम

लवादाच्या निर्णयावर न्यायालयाचे शिक्कामाेर्तब

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : विकसकाने अपील दाखल केल्याच्या कारणास्तव सदनिका वाटप झालेल्या व्यक्तीने भरलेले पैसे अडकवून ठेवता येणार नाहीत. त्याला अनिश्चित काळापर्यंत ताटकळत ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवून अपीलीय लवादाचे आदेश कायम ठेवले.

कराराला ११ वर्षे झाली असून, ताबा देण्याच्या आश्वासित तारखेलाही सात वर्षे झाली आहेत. त्यासाठी सदनिका खरेदी करणाऱ्याने माेठी रक्कम भरली आहे. त्यामुळे न्यायाधिकरणाचा निर्णय विवेकपूर्ण आणि तर्कशुद्ध असल्याचे न्या. एन. जे. जमादार यांनी ‘रेअर टाउनशिप्स प्रायव्हेट लिमिटेड’ने दाखल केलेले हे अपील फेटाळताना नमूद केले. सदनिका खरेदीदार मितुल गाडा यांना विकसकाकडे जमा केलेली रक्कम काढून घेण्याची परवानगी अपीलीय लवादाने दिली हाेती. ती कायम ठेवताना विकसकाला (डेव्हलपरला) खटल्यात यश आल्यास ही रक्कम व्याजासह परत करण्याच्या हमीवर ही परवानगीची अटही न्यायालयाने कायम ठेवली.

गाडा यांनी २०१५मध्ये नॉर्थ सी हाइट्स (ए१) या प्रकल्पातील १९व्या मजल्यावरील दोन सदनिकांचे बुकिंग केले होते. विक्रीचा करार २ नोव्हेंबर २०१५ला करण्यात आला. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सदनिकांचा ताबापत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. १.६० कोटींहून अधिक आणि १.५६ कोटींहून अधिक किंमत असलेल्या या सदनिकांसाठी गाडा यांनी अनुक्रमे ९८.९२ लाख आणि ६९.६६ लाख रुपये रक्कम भरली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT