मुंबई

घाटकोपरमध्ये आठ रिक्षांना आग

CD

घाटकोपरमध्ये आठ रिक्षांना आग
अग्‍निशमन दलाच्या तत्‍परतेमुळे जीवितहानी टळली
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) : घाटकोपर परिसरात बुधवारी (ता. १) दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घाटकोपर पूर्वेतील गरोडियानगरमध्ये पुलाखाली उभ्‍या असलेल्‍या आठ रिक्षांना आग लागली, तर विद्याविहार पश्चिम येथील इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. घाटकोपर पूर्व येथील गरोडियानगर परिसरात उभ्या असलेल्या सुमारे आठ रिक्षांना आग लागली. या आगीत रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विद्याविहार पश्चिम येथील स्कायलाइन एपिटोम इमारतीतील इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. प्राथमिक माहितीनुसार, उभ्या असलेल्या रिक्षांच्या मागे सुक्या कचऱ्याचा ढीग साचलेला होता. त्यामध्ये कुणीतरी ओढलेली सिगारेट टाकल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता पंतनगर पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसून, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.
या घटनेदरम्यान स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी यांनी तातडीने पालिका व अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बचावकार्य अधिक जलद गतीने पार पडल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT