मुंबई

अनधिकृत टपऱ्या हटवून रस्ते मोकळे

CD

अनधिकृत टपऱ्या हटवून रस्ते मोकळे
जोगेश्वरी पूर्वेत पालिकेची कारवाई
जोगेश्वरी, ता. २ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदयनगर परिसरात हेमा इंडस्ट्रिजसमोरील रस्त्यासह संपूर्ण भागातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात पालिकेच्या निष्कासन विभागाने गुरुवारी सकाळी मोठी कारवाई केली.
पालिका ‘के पूर्व’ विभागाकडे या भागातील रस्ते व फुटपाथ व्यापून बसलेल्या भाजीविक्रेते, फेरीवाले आणि इतर अनधिकृत विक्रेत्यांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत विभागाचे अधिकारी मॅन्युअल फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान बस थांबे, मुख्य रस्ते आणि फुटपाथवरील अनधिकृत टपऱ्या, फलक व हातगाड्या हटवण्यात आल्या. तसेच फुटपाथवर ठेवलेला माल जप्त करण्यात आला. काही ठिकाणी बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले. यापूर्वी अंधेरी पूर्वेतील पंपहाउस परिसरातील आघाडीनगर व विकासनगर येथेही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ‘के पूर्व’ विभागात अतिक्रमणाविरोधात सातत्याने मोहीम राबविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईमुळे दीर्घकाळ अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झालेल्या बस थांबे आणि रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील काळातही अशा कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT