मुंबई

पालिका शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव उघड; तातडीने कारवाईचे निर्देश

CD

पालिका शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव
नगरसेवक ममित चौगुले यांच्याकडून पाहणी; तातडीने कारवाईचे निर्देश
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः ऐरोलीतील दिवा गाव येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर ममित चौगुले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता संताप व्यक्त केला आहे. तसेच, प्रशासनाला तातडीने कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
पालिकेच्या शाळेत विद्यार्थी वापरातील शौचालयाच्या छतामधून पाणी गळत असून, स्वच्छतेचा अभाव असल्याचे आढळले. तसेच, पिण्याच्या पाण्याचा फिल्टर खराब अवस्थेत असून, त्यातूनही गळती होत असल्यामुळे परिसरात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. याची ममित चौगुले यांनी पाहणी करत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब त्यांनी गंभीरतेने मांडली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत चौगुले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुरुस्ती व सुधारणा कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या कामांचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT