खारघरमध्ये स्तन कर्करोग पुनर्वसनावर आंतरराष्ट्रीय चर्चा
टाटा रुग्णालयात जागतिक तज्ज्ञांची उपस्थिती; उपचार पद्धतींमध्ये नव्या दिशा
खारघर, ता. २ (बातमीदार) ः स्तनाचा कर्करोग पुनर्वसनासाठी बहुआयामी उपचार पद्धतींना बळकटी देण्याच्या दृष्टीने खारघर येथील टाटा रुग्णालयामध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग पुनर्वसन परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेचे उद्घाटन उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांच्या हस्ते झाले. या परिषदेत भारतासह यूएई, युनायटेड किंगडम, श्रीलंका आणि बांगलादेश येथील एकूण २३८ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी ऑनलाइन माध्यमातूनही सहभाग नोंदविला. यात कर्करोगतज्ज्ञ, क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपीचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते.
खारघरमधील टाटा हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या परिषदेमध्ये स्तन कर्करोग पुनर्वसनातील नव्या प्रगती, संशोधन आणि रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी बहुआयामी टीमचे महत्त्व यावर चर्चा झाली. सचिव व ऑक्युपेशनल थेरपी विभागप्रमुख डॉ. जगमोहन लाल मीणा यांनी भाषण केले. ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ जॉन बॉयाजेस यांनी आपल्या मार्गदर्शनपर विचारांनी कार्यक्रमाला विशेष समृद्धी दिली. या वैज्ञानिक सत्रांमध्ये डॉ. दिलीप आर. होयसळ, प्रो. जॉन बॉयाजेस, डॉ. अंबरासन सेकरमणा यांच्यासह अमेरिकेतील मनीषा अग्रवाल, शालू चौधरी व गीता नाथ यांनी मार्गदर्शन केले. टाटा मेमोरियल सेंटरच्या अंतर्गत तज्ज्ञांमध्ये डॉ. सविता गोस्वामी, किशोर होवळे, निशू सिंग गोयल, डॉ. रेबेका मारी, डॉ. सारिका महाजन, डॉ. मोहुआ चॅटर्जी, नंदिता धनाकी व डॉ. ब्लॉसम बेबी या तज्ज्ञांनी पुनर्वसन प्रक्रियेत समन्वयित उपचार पद्धतींची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, उपसंचालक डॉ. नवीन खत्री तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत भट यांचे आयोजन सचिवांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.