मुंबई

पालिकेच्या विद्यालयाला रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव

CD

पनवेल, ता. २ (बातमीदार) : महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नवीन विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नितीन पाटील यांनी दिली.

पनवेल महापालिकेच्या सभेत विरुपाक्ष सभागृहाजवळील अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयासंदर्भात चर्चा झाली. या विद्यालयाला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील महासभेत मांडण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. या पार्श्वभूमीवर नगरसेवक परेश ठाकूर यांनी विद्यालयासाठी १० कोटींची देणगी जाहीर केली. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनीही रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यास समर्थन दर्शवले.

सभेत काही वेळ गोंधळ
संबंधित भूखंड जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावाला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला. यावर सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी ठाम भूमिका मांडत, संस्थेची कार्यपद्धती व गुणवत्ता अधोरेखित केली. मात्र, विरोध कायम राहिल्याने, हा भूखंड संस्थेला न देता पालिकेने स्वतः शाळा उभारावी व तिला रामशेठ ठाकूर यांचे नाव द्यावे, असा पर्यायी प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या विषयावर पुढील महासभेत अंतिम निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

माधुरी नको म्हणत असतानाही दिग्दर्शकानं बळजबरीनं शूट केलं गाणं, रिलीज होताच ठरलं सुपरहिट

IPL 2026 Playoff Race: मुंबई विरुद्ध राजस्थान: प्लेऑफची चौथी जागा कोणाची? पाहा सविस्तर समीकरणे!

SCROLL FOR NEXT