महिला सक्षमीकरणासाठी रोहा पोलिस ठाण्यात बैठक
रोहा (ता. २) : महिला सक्षमीकरणासंदर्भात राज्य महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), माविम मित्र मंडळ आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक मंगळवारी (३१ मार्च) रोहा पोलिस ठाणे येथे पार पडली. ओम साई प्रेरणा लोकसंचालित साधना केंद्र, अलिबाग यांच्या माध्यमातून आयोजित या बैठकीस व्यवस्थापक शामीम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, संघटन बळकटीकरण आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविण्याचे कार्य माविम करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. ‘एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रभा’ हे ब्रीद जपत महिलांचे सबलीकरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक व स्वतंत्र महिला कक्ष कार्यरत असल्याची माहिती दिली.
यावेळी सहयोगिनी शामल खांडेकर, संजीवनी पोटफोडे, महिला पोलिस कर्मचारी पेडवी मॅडम, प्रेषित भांड तसेच खारी गौळवाडी, वरसे, भुवनेश्वर येथील माविम मित्र उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : महिला सक्षमीकरणासंदर्भात आयोजित बैठकित उपस्थित महिला व पोलिस अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.