मुंबई

रानमेव्यापासून रोजगाराची संधी

CD

रानमेव्यातून रोजगाराची संधी

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : विक्रमगड तालुका हा आदिवासीबहुल असून येथील रानमेवा सर्वत्र प्रसिद्ध आहे; मात्र आधुनिकतेच्या लाटेत आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर या रानमेव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दुसरीकडे, याच रानमेव्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे उन्हातान्हात दिवसभर जंगलात फिरून रानमेवा गोळा करतात. या मेहनतीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. गोळा केलेला रानमेवा भिवंडी, कल्याण, ठाणे, वसई-विरार, पालघर यांसारख्या शहरांमध्ये विक्रीसाठी नेला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि निसर्गातील अनियमितता यामुळे या रानमेव्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. याचबरोबर, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक अन्नपदार्थांच्या वाढत्या वापरामुळे रानमेव्याची पारंपरिक मागणी कमी होत चालली आहे. परिणामी, अनेक ठिकाणी गोळा केलेला रानमेवा विक्रीअभावी खराब होण्याची वेळ येते.
निसर्गाने दिलेल्या या अमूल्य रानसंपत्तीचे जतन करून तिचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागासाठी रोजगारनिर्मितीचे मोठे द्वार खुले होऊ शकते. त्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
-------------
रोजगाराचे स्रोत

योग्य नियोजन आणि संघटन केल्यास रानमेवा हा ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा रोजगाराचा स्रोत ठरू शकतो. बचत गटांच्या माध्यमातून रानमेव्याचे प्रक्रिया उद्योग उभारल्यास लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता आहे. आमसुले, कोकम सरबत, काजूगर, काजू बर्फी, फणसपोळी, आंबाडी पोळी, सुकविलेले साटे, तळलेले गरे, करवंद लोणचे, आवळा काठी, मोरावळा, मावा, मोरांबा अशा विविध उत्पादनांची निर्मिती करून बाजारपेठेत विक्री करता येऊ शकते.

------------
प्रतिक्रिया :
दरवर्षी मार्च ते मे महिन्यात मिळणारे करवंद, जांभूळ, कैऱ्या, तोरण, धामण हा खास रानमेवा आहे; मात्र ग्रामीण भागात योग्य बाजारपेठ नसल्याने विक्री होत नाही आणि बराचसा माल वाया जातो.
- अनिल गोविंद, ग्रामस्थ, ओंदे

प्रतिक्रिया :
उन्हाळ्यात मिळणारा हा दुर्मिळ रानमेवा शहरात विक्रीसाठी नेला जातो. त्यातून अनेकांना रोजगार मिळतो; मात्र शहरी भागात चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली, तर महिलांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.
- मीना कोरडा, फळविक्रेती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT